Type to search

Featured सार्वमत

लोणी : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

Share

लोणी | वार्ताहर

रविवारी दि. २३ रोजी सूर्योदयापूर्वी लोणी-हनुमंतगाव रस्त्यावर बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. रस्त्यालगतच्या गव्हाच्या शेतात बिबट्या पडल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी वन्यजीव प्राणी मित्र विकास म्हस्के यांना माहिती दिलीव ते घटनास्थळी हजर झाले.

हनुमंतगाव येथील बाबासाहेब रघुनाथ ब्राह्मणे यांच्या गट क्र. १९९ मध्ये साडेतीन वर्ष वयाचा मादी बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. म्हस्के यांनी वन अधिकाऱ्यांना माहिती दिल्यावर ते घटनास्थळी हजर झाले. लोणीचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. खपके यांनी शवविच्छेदन करून व्हिसेरा राखून ठेवला.

मृत मादीच्या पोटात पूर्ण वाढ झालेले बछडे होते. त्यानंतर जागेवरच बिबट्याला अग्नी देण्यात आला. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव, वन संरक्षक आदर्श रेड्डी, सहाय्यक वन संरक्षक रमेश देवखीळे, वनपाल जी. बी. सुरासे, बी. एस. गाढे, डी. एन. जाधव, पी. डी. दवंगे, पंढरे आदी उपस्थित होते.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!