Type to search

Featured नाशिक

नृत्याचा संगीताशी संगम..

Share

नाशिक | प्रतिनिधी

मंगलमय व प्रसन्न अशा वातावरणात गणेशस्तवनाने सुरू झालेली कथक परिक्रमा पुढे, कलानंदच्या उदयोनमुख नृत्यांगनानी सादर केलेली तीन तालातील बंदिश,  एकताल, आलाप आदीच्या प्रस्तुतीतून उत्तरोत्तर रंगत गेली निम्मित होते कलानंद संस्था प्रस्तुत कथक परिक्रमा या नृत्याविष्काराचे.

येथील कलानंद कथक नृत्य संस्थेने चाळीसाव्या वर्षात पदार्पण केल्याने कलानंदच्या उदयोनमुख व पारंगत विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार याच बरोबर संस्थेच्या संचालिका डॉ. अथणी यांना पी. एच. डी पदवी संपादनानिम्मित कालिदास कलामंदीर येथे सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. उत्तररंगात कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख पाहुण्या डॉ मंजिरी देव यांचा सन्मान संजीवनी कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. डॉ.मंजिरी देव यांनी यावेळी विद्यार्थीनीना मार्गदर्शन केले. कलानंदच्या संचालिका डॉ. सुमुखी अथणी यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्या बद्दल संस्थेतर्फे त्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या दुसर्‍या सत्रात डॉ अथणी यांच्या प्रबंधावर आधारीत ‘भाव दर्पण’ नृत्यरचनेचा कार्यक्रम सादर झाला. ह्यात मातृवंदना, ध्रुवप्रद, सादरा, सावनी, व तराणा अशा काही अप्रचलित बंदिशांचे सुदर प्रदर्शन संस्थेच्या पारंगत विद्यार्थीनींनी केले. सर्व रसिकांनी यावेळी या नृत्याविष्काराला भरभरुन दाद दिली.

त्यांना तबला नितीन पवार व व्यंकटेश तांबे , संवादिनी पुष्कराज भागवत , बासरी मोहन उपासनी, सिंथेसायझर अनिल धुमाळ यांनी उत्कृष्ट साथसंगत केली.नृत्याचा संगिताशी संगम

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!