Type to search

Breaking News Featured टेक्नोदूत मुख्य बातम्या

जिओ गिगाफायबर आज होणार लाँच

Share

मुंबई | वृत्तसंस्था

बहु प्रतीक्षेनंतर आज (दि. 5 सप्टेंबर) रिलायन्स कंपनीचे जिओ गिगाफायबर लाँच होणार आहे. स्वस्त दरात अति वेगवान इंटनेट सुविधा यामुळे ग्राहकांना मिळणार आहे. रिलायन्स कंपनीने मागील वर्षी 5 जुलैला याबाबत घोषणा केली होती.

मागील अनेक महिने देशातील ठराविक शहरांमध्ये जिओ गिगाफायबर प्रायोगिक तत्वावर सुरू होते. 12 ऑगस्टला रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत जिओ फायबरच्या लाँचिंगची घोषणा करण्यात आली होती.

जिओ गिगाफायबरचा प्लँँन 700 रुपयांपासून 10 हजार रुपयांपर्यंत असणार आहे. आजपासून लोकांना हे प्लँँन्स घेता येणार आहे. कनेक्शनसोबत ग्राहकांना 4K सेट टॉप बॉक्स मोफत मिळणार आहे.

या सेट टॉप बॉक्सच्या माध्यमातून एकावेळी चार जण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करू शकणार आहेत. या व्यतिरिक्त इतर अनेक फिचर्स जिओ गिगाफायबरच्या ग्राहकांना मिळणार आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!