Type to search

Featured देश विदेश

जम्मू काश्मीर: रक्तपात नाही, केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती

Share

दिल्ली | वृत्तसंस्था

घटनेतील कलम ३७०च्या तरतुदी रद्द झाल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये निर्बंध लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवडे पुढे ढकलली आहे. काँग्रेस कार्यकर्ते तहसीन पूनावाला यांनी ही याचिका केली आहे. सर्वोच्च न्यायालायने याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलताना जम्मू काश्मीरमधील परिस्थिती पुन्हा एकदा सर्वसामान्य होण्याची वाट पाहू असे सांगितले  आहे.

तहसीन पूनावाला यांनी आपल्या याचिकेत कर्फ्यू हटवण्याची तसंच फोन लाइन, इंटरनेट, न्यूज चॅनेल्स आणि इतर गोष्टींवर लावण्यात आलेले निर्बंध हटवण्याची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने यावेळी हे किती दिवस सुरु राहणार आहे? अशी विचारणा केली. यावर उत्तर देताना अँँटर्नी जनलरनी सांगितलं की, “आम्ही प्रत्येक दिवसाच्या परिस्थितीची माहिती घेत आहोत. ही अत्यंत संवेदनशील गोष्ट असून, प्रत्येकाच्या हिताची आहे. रक्ताचा एक थेंबही सांडलेला नसून, कोणाचाही मृत्यू झालेला नाही”.

सर्वोच्च न्यायालायने दखल देण्यास नकार देत, सरकार जम्मू काश्मीरमध्ये लावण्यात आलेल्या निर्बंधावर निर्णय घेण्यास मोकळं असल्याचं सांगितलं. तसंच सर्वोच्च न्यायालयाने दखल दिली तर समस्या वाढतील अशी शक्यताही व्यक्त केली. “परिस्थिती सर्वसामान्य होईल अशी अपेक्षा आहे. पण एका रात्रीत काही होऊ शकत नाही. काय सुरु आहे याची कोणालाही माहिती नाही.

संवदेनशील प्रकरण असल्याने सरकारवर निर्भर राहणं गरजेचं आहे”, असंही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालायने दोन आठवड्यांसाठी याचिका पुढे ढकलत दोन आठवड्यानंतर परिस्थिती काय असेल याचा आढावा घेऊ असं सांगितलं आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!