Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

आयएनएक्स मीडिया प्रकरण: चिदंबरम यांच्यासह 15 जणांवर आरोपपत्र दाखल, जामिनावरील निर्णय सुरक्षित

Share

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

आयएनएक्स मीडिया प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, व पुत्र कार्ती चिदंबरम तसेच पीटर मुखर्जी, इंद्राणी मुखर्जी यांच्यासह 15 जणांविरुद्ध आज दिल्लीतील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणी पुढील सुनावणी 21 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

आयएनएक्स मीडियाप्रकरणी सीबीआयने विशेष न्यायाधीश लालसिंग यांच्यापुढे आरोपपत्र दाखल केले. यात आयएनएक्स मीडिया, एएससीएल अँड चेस मॅनेजमेंट सर्व्हिसेससह एस. भास्करमण, निती आयोगाच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुश्री खुल्लर, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे माजी सचिव अनुप के. पुजारी, प्रबोध सक्सेना, रविंद्र प्रसाद यांच्यावरही आरोप ठेवण्यात आले आहेत.

पी. चिदंबरम यांच्याविरुद्ध जबाब देणारी केवळ इंद्राणी मुखर्जीच नाही तर अन्य एक साक्षीदार असल्याची माहिती आज सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात दिली. ही नवी माहिती पुढे आली असल्याने चिदंबरम यांच्या अडचणींत आणखीच भर पडली आहे.

दरम्यान, दिल्लीतील राउज एव्हेन्यू कोर्टाने चिदंबरम यांच्या कोठडीत २४ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. चिदंबरम सध्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) ताब्यात आहेत. त्यांना आता २४ ऑक्टोबर रोजी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!