Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पेठ : धक्कादायक! चक्क गाडीच्या बोनेटमधून विदेशी मद्याची वाहतूक

Share

पेठ : वाहनाच्या बोनेट मधून अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनास पकडण्यात आले असून यामध्ये दोन लाख ५० हजार रूपये किमतीची विदेशी दारू पकडण्यात आली आहे. वाहनचालक फरार असून पोलीस तपास घेत आहेत.

अधिक माहिती अशी कि, गुजरात राज्यातून महाराष्ट्राच्या हद्दीत कार मधून मद्य वाहतूक होत असल्याची गुप्त खबर पो.नि.आर. एम . गाडे पाटील यांना मिळाल्याने त्यांनी वाहतूक पथकास सुचना केल्या. खबरी प्रमाणे इको कार जीजे १५, सीडी ६१४२ येतांना दिसताच बॅरीकेट लावण्यात आल्याने कार चालकाने गाडी पुन्हा गुजरातच्या दिशेने वळवून पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र सावध पोलीसांनी खाजगी वाहनाने पाठलाग करुण राजबारी फाट्याजवळ गाडीस गाठण्याचा प्रयत्न करताच वाहन चालक व त्याचा साथीदार यांनी वाहन सोडून पळ काढला.

दरम्यान पोलिसांनी कारची तपासणी केल्यानंतर इंजिन बोनेट मधून इंम्पेरीयल ब्लू कंपनीच्या ७५० मिलीच्या २४ बाटल्या आढळून आल्याने तस्करीचा नविनच फंडा उघडकीस आला. वाहतुक पोलीस पथकातील पो. ना. किरण बैरागी, पोकॉ. खिरकाडे, भोये आदींनी वाहनासह मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

यात ६ हजार रुपयांचे मद्य, २ लाख ५० हजार रुपये किमतीची इको कार असा एकुण २ लाख ५६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान अज्ञात वाहनचालकांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन पो .ना. शेख अधिक तपास करीत आहेत .

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!