Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

कौतुकास्पद! पोलिसांंसह होमगार्डची प्रतिमा उंचावली; महिलेचे 71 हजार रूपये केले परत

Share

नाशिक | प्रतिनिधी

रस्त्याच्या कडेला पडलेल्या पर्समधील 71 हजार रुपये आणि महत्वाची कागदपत्रे नाशिकरोड पोलिस ठाण्याचे कर्मचारी आणि होमगार्ड जवानाने महिलेला परत केली. या कामगिरीबद्दल पोलीसांसह होमगार्डची प्रतिमा उंचावली आहे. परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विजय खरात यांच्यासह नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी दोन्ही कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले.

पोलीस आयुक्तांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात आठ तासांच्या तीन शिफ्टमध्ये प्रत्येकी 5 बीट मार्शल नेमले आहेत. त्यामुळे प्रत्येक बीट मार्शलच्या कामाचे वर्गीकरण झाले असून त्यांची कार्यक्षमता वाढली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या जोडीला होमगार्डचे जवानही असल्याने मनुष्यबळात वाढ झाली आहे. गुरुवारी (दि.7) सकाळी 7.30 च्या सुमारास नाशिकरोड पोलीस ठाण्याचे बीट मार्शल पोलीस हवालदार संजय शिंदे व होमगार्डचे जवान मोहन शिंदे परिसरात पेट्रोलिंग करीत होते.

त्यावेळी सौभाग्य नगर, लॅमरोड येथे रस्त्याच्या कडेला त्यंना एक पर्स आढळली. शिंदे यांनी पर्सची पाहणी केली असता त्यात 71 हजार रुपये आणि डेबीट व क्रेडीट कार्ड, वाहनाचे कागदपत्र असा ऐवज होता. पोलीस कर्मचारी शिंदे यांनी पर्समधील कागदपत्रावर असलेल्या अंजना सुदाम जाधव यांच्याशी मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून त्यांना नाशिकरोड पोलीस ठाण्यात बोलवले. तसेच पर्सची व ऐवजाची ओळख पटवून त्यांनी पैसे आणि इतर ऐवज परत केला. जाधव यांनी पोलिसांचे आभार मानले.

त्यांच्या ह्या प्रामाणिकपणामुळे इतरांना नक्कीच प्रेरणा मिळेल तसेच यामुळे पोलिसांची प्रतिमा उंचावली आहे. अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी यावेळी दिली. त्यांच्या या प्रामाणिकपणामुळे पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 विजय खरात यांनी त्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या प्रामाणिक कामगिरीचे भरभरून कौतुक केले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!