Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतले श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शन

Share

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी 

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी त्र्यंबकेश्वर येथे ज्योर्तिलिंगाचे दर्शन घेतले आणि महापुजा केली. यावेळी उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, येवला उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाटील, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगांवकर, उपनगराध्यक्ष कैलास चोथे, देवस्थानचे विश्वस्त संतोष कदम, तहसीलदार दीपक गिरासे आदी उपस्थित होते. त्र्यंबकेश्वर येथे आगमन झाल्यावर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रवीण निकम यांनी राज्यपाल महोदयांचे स्वागत केले.

शासनाच्या प्रसिद्धी खात्याला करावी लागली अँँडजस्टमेंट

आज पंतप्रधान मोदींचा दौरा असल्याने विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयांना फोटो व माहिती घेण्यासाठी धावपळ करावी लागली. नाशिकचे अधिकारी, सहकारी नाशिकसभा व ओझर विमानतळ इकडे लक्षघालून होते तर राज्यपाल दौरा त्र्यंबकेश्वर प्रसंगी नगर कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

दरम्यान, शासकीय प्रोटोकोल असलेला हा दौरा खाजगी आहे असे सुरवातीलाच सांगून राज्यपाल सुरक्षा अधिकारी यांनी फोटो काढण्यास मनाई केली होती.

 

 

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!