Type to search

टेक्नोदूत मुख्य बातम्या

आता बिनधास्त बोलून सर्च करा! गुगलने लाँच केले नवे गो सर्च अँँप

Share

मुंबई | वृत्तसंस्था

लोकप्रिय सर्च इंजिन गुगलने गो सर्च नावाचे अँँप लाँच केले आहे. गुगल सर्चचे हे गो सर्च हे अ‍ॅप लाइट व्हर्जन आहे. तसेच हे अँँप 75 MBचे आहे. यामध्ये एखादी गोष्ट सर्च करण्यासाठी फक्त काही सेकंदच लागणार आहेत. हे अ‍ॅप ग्लोबली सर्व अ‍ॅन्ड्रॉइड स्मार्टफोनच्या प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

हे अ‍ॅप गुगल गो अ‍ॅप अ‍ॅन्ड्रॉइड 5.0 लॉलीपॉप आणि त्यानंतरच्या सर्व वर्जनमधील स्मार्टफोनमध्ये कार्यरत असणार आहे. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने गुगल लेन्ससारखाच टेक्स्टला कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये ठेऊन वाचू शकतो किंवा ट्रान्सलेट करता येणार आहे. त्याचसोबत मोबाईलच्या कॅमेऱ्यामधून क्यू आर कोड स्कॅनकरुन सुद्धा एखाद्या गोष्टीची माहिती मिळवू शकता.

तुम्ही अ‍ॅपच्या कॅमेऱ्यात दिसणारा टेक्स मेसेज बोलून ऐकून दाखवू शकता. गुगल कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी याबाबतची माहिती पोस्ट केली होती. तसेच गुगल गो मधील अजून एक दमदार फिचर म्हणजे एखाद्या वेबसाईटवरील लिहिलेला संदेश स्पीकरच्या माध्यमातून ऐकवला जाणार आहे.

युजर्सला अ‍ॅन्ड्रॉइड गो ऑपरेटिंग सिस्टिममध्ये अन्य गुगल अ‍ॅपचे लाइट व्हर्जन उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. यामध्ये Gallery Go, Gmail Go आणि YouTube Go यांचा समावेश आहे. परंतु गुगल गो अ‍ॅप हे कंपनीच्या अँँन्ड्रॉइड गो ऑपरेटिंग सिस्टिमचा एक भाग असल्याचे सांगण्यात आले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!