Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

दिंडोरी : चौदा वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; महिनाभरात दुसरी घटना

Share
अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल, Latest News Crime News Shrigonda

जानोरी | वार्ताहर

मागील काही दिवसांपूर्वीच दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे एका आठ वर्षीय मुलीवर बलात्कार झाला होता ती घटना विसरत नाही तोच मोहाडीत पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

१४ वर्षीय आठवी इयत्तेत शिकणार्‍या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार केल्याची घटना दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे उघडकीस आली. गेल्या महिन्यात येथे आठ वर्षांच्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती आता पुन्हा याच गावात ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे परिसरातील महिला, युवती व विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार पीडित मुलीचे आई-वडील मोलमजुरी करतात. तिचे आई-वडील नेहमीप्रमाणे शेती कामास गेले असताना आरोपी कार्तिक तानाजी पवार वय १९ राहणार खडक सुकेणे तालुका दिंडोरी याने पीडित मुलगी शाळेतून घरी येत असताना तिचे तोंड दाबून जवळील शेतातील द्राक्ष बागेत ओढत नेऊन अत्याचार केला. आई वडील घरी आल्यानंतर मुलीने घडलेली आपबिती सांगितली. पीडित मुलीच्या आई-वडिलांनी तात्काळ दिंडोरी पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी भादवि कलम 376 506 पोक्सो कायदा कलम ४ व ८ प्रमाणे गुन्हा दाखल केला. दिंडोरी नगरपंचायतीच्या नगरसेविका शैला उफाडे यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला असून आरोपीस कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अधिक तपास दिंडोरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल कुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन नवले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण आव्हाड, हवालदार शंकर जाधव, दिलीप पगार आदी अधिक तपास करत आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!