Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

येवला शहरांमध्ये लग्नाचे आमिष दाखवून सामूहिक बलात्कार; गुन्हा दाखल

Share

येवला | प्रतिनिधी

लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार केल्याचा गुन्हा येवला शहर पोलिसात दाखल झाला असून यातील चार आरोपींना अटक झाली असून उर्वरित दोघांना अटक करण्यासाठी पथके रवाना झाल्याची माहिती येवला शहर पोलिसांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील नांदगाव रोड भागात राहणाऱ्या एका पिडीतेवर सहा जणांनी मिळून बलात्कार केल्याची घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पीडित महिला आपल्या कुटुंबासह येवला शहरातील नांदगाव रोड भागात राहते पीडितेशी ओळख वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखवून येवला शहर व तालुक्यातील एकूण सहा जणांनी पीडितेवर बलात्कार केल्याची फिर्याद पीडित महिला व तिच्या कुटूंबियांनी येवला शहर पोलिसांत दिली आहे.

यातील सहा संशयित आरोपी मध्ये गणेश सुरसिंग परदेशी याने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून येवला शहरातील सन्मान लॉज व शिर्डी येथे नेवून वेळोवेळी बलात्कार केल्याचे तसेच मुख्य आरोपि सोबत असलेल्या पाच युवकांनी बलात्कार केल्याची फिर्याद येवला शहरातील एका विवाहितेने दिल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

त्यात मुख्य आरोपी संशयीत आरोपी क्र १) गणेश सुरसिंग परदेशी व त्याचे साथीदार आरोपी क्र २) नाना पूर्ण नाव समजू शकले नाही. आरोपी क्र ३) पंकज उर्फ नारायण गणेश, आरोपी क्र ४) शरीफ पूर्ण नाव समजू शकले नाही. आरोपी क्र ५) संदीप उर्फ बाबा गुजर (येवला)
आरोपी क्र ६) रवी जाधव (वडगाव तालुका येवला) असे सहा संशयित आरोपी असून चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींना अटक करण्यासाठी पोलिस पथके रवाना झाली असल्याची माहिती मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांनी दिली सदर आरोपी विरोधात येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा १३/२०२० भा. द. दाखल करण्यात आला आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!