Type to search

Breaking News Featured नाशिक

Photo Gallery: देखाव्यांतून जनजागृती व प्रबोधन; देखावे पाहाण्यासाठी नागरीकांची गर्दी

Share

नाशिक | गणेश सोनवणे

शहरातील गणेशोत्सवात यंदा मंडळाकडून विविध समाजिक संदेश देणारे पौराणिक, देशभक्तीपर व प्रबोधनात्मक देखावे साकारण्यात आले असून ते आकर्षक व लक्षवेधी ठरत आहे. त्यात शनिवार आणि रविवारची साप्ताहिक सुट्टी आल्याने देखावे पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होते आहे.

यंदा गणेश मंडळाची संख्या कमी असली तरी नेहमी प्रमाणे गणेशोत्सवाची धूम आहे. खबरदारीचा उपाय म्हणुन अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे व पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रविवारची साप्ताहिक सुट्टी असल्याने शहरातील बी.डी भालेकर मैदान, कॉलेज रोड ,रविवारी कारंजा, शालिमार, गंगापुर रोड, पंचवटी , आदी ठिकाणी गर्दी होईल हे लक्षात घेत मंडळानीही आपले देखावे नागरिकांसाठी सज्ज ठेवले आहेत.


नाशिक जिल्हा एच.ए. एल कामगार मित्र मंडळाने सोशल मीडियावरील दुष्परिणामांची जागृती करणारा देखावा साकारला आहे. रोशन सोनवणे हे या मंडळाचे अध्यक्ष आहेत.

बी डी भालेकर मैदान येथे श्री नरहरी राजा सामाजिक संस्थेतर्फे भारताने पाकवर केलेला यशस्वी सर्जिकल स्ट्राइक चा देखावा सादर केला आहे. या देखाव्यातून देशभक्तीपर संदेश देण्याचा प्रयत्न केला असल्याचे संस्थेचे अध्यक्ष वंदन आहेर यांनी सांगितले.


अशोक स्तंभ गणेशोत्सव मित्र मंडळातर्फे भक्त प्रल्हाद व नृसिंह अवताराचा पौराणिक देखावा सादर केला आहे. सुनील डुमणे हे या मंडळाचे अध्यक्ष आहेत

रविवार पेठ रविवार कारंजा येथे गजानन महाराजांचे चलचित्र साकारण्यात आले आहे. त्या बरोबरच वारकरी संप्रदायाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न या देखाव्यातून करण्यात आला आहे. सुनील घुमने या मंडळाचे अध्यक्ष आहे.

शालिमार येथे नामको बँक परिवाराच्या गणेशोत्सव मंडळाने रामायणातील एका पौराणिक कथेचे चित्र आपल्या लेखातून साकारले आहे . रावण पुत्र मेघनाथ याच्या नागपाश अस्रातून गरुड राजाने केलेली प्रभु रामचंद्र व लक्ष्मणाची सुटका या देखाव्यातून दाखवण्यात आली आहे. प्रफुल्ल बुधमल संचेती या मंडळाचे अध्यक्ष आहेत.

शिवसेना प्रणीत यशवंत सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ मंडळाने श्रावणातील निसर्ग सृष्टीचे दर्शन घडवणारा देखावा सादर केला आहे. या देखाव्यात नाचरे मोरा आंब्याच्या वनात.. या गाण्यावर मोरांनी व लहानग्यांनी ताल धरला असल्याने लहानामुलांसाठी हा देखावा आकर्षित ठरत आहे.


बॉस गणेशोत्सव मंडळांनी यंदा वटसावित्री व्रताचे महात्म्य सांगणारा देखावा साकारला आहे. सावित्रीने आपला पती सत्यवानाच्या प्राणांची यमपाशातून सुटका केली. काळावर मात करत आपल्या पतीला यमराजाकडून जीवदान मिळवून दिल्याची कथा दाखविण्यात आली आहे. प्रवीण पाटील या मंडळाचे अध्यक्ष आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!