Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकमध्ये

Share

मुंबई:

अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी त्याचे  घर गाठले आहे. तेथे सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांचे स्वागत केले आहे.

नेपियन्सी रोडवरील श्रीनिवास पवार यांच्या घरातून निघालेले अजित पवार थेट शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी दाखल झाले. रात्री सव्वाआठच्या सुमारास अजित पवार तिथे पोहचले.

कारमधून उतरून माध्यमांना टाळत धावतच अजितदादांनी सिल्व्हर ओकमध्ये प्रवेश केला. पवारांच्या घराचा दरवाजा उघडाच होता. तिथे सुप्रिया यांनी त्यांचं स्वागत केलं. अजितदादा घरात जाताच दरवाजा बंद करून घेण्यात आला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!