Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video: नाशकात दहीहंडीचा उत्साह शिगेला

Share
पंचवटी | वार्ताहर
गोविंद रे गोपाळा, तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे.. अशा विविध हिंदी मराठी गीतांच्या तालावर ठेका धरत शेकडो गोविंदांच्या उपस्थितीत कृष्णनगर येथे दरवर्षी प्रमाणे गोकुळाष्टमी निमित्ताने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. आज सायंकाळी अनेरी मकवाना या गोपिकाने दहीहंडी फोडली.
कृष्णनगर येथे कृष्ण मंदिरात गोकुळ जन्माष्टमी निमित्ताने चार दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काल रात्री मंदिरात कृष्ण जन्म साजरा करण्यात आला. सायंकाळी दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शेकडो गोविंदांच्या उपस्थितीत आणि विविध हिंदी मराठी गीतांच्या तालावर ठेका धरत नृत्य करत एकावर एक थर करत एका महिला गोपिकाने दहीहंडी फोडली.
कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांना गोपाळकाला प्रसाद वाटप करण्यात आला. कार्यक्रमाला आमदार बाळासाहेब सानप, नगरसेवक मच्छिंद्र सानप, प्रियंका माने, धनंजय माने आदींसह श्रीकृष्ण जन्मोत्सव समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!