Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच नाशिक फोटोगॅलरी मुख्य बातम्या

Photo Gallery: जिल्हाभरात बैलपोळा उत्साहात

Share

नाशिक | प्रतिनिधी

बळीराजा बद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी बैलपोळा साजरा केला जातो. आज जिल्हाभरात बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रंगबेरंगी फुल, गोंडे, कपाळाला भलं मोठं बाशिंग, पाठीवर आकर्षक झूल यामुळे बळीराजा चा थाट काही औरच होता.

दरम्यान, जिल्ह्यातील विविध भागात बळीराजाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच सजवलेल्या बैलांची गावातील मारुती मंदिरात सैर घडवून गावातील अनेक बैलजोड्या या ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या दिसून आल्या. दरम्यान असा पोळ्याचा उत्साह शहर परिसरातील गावांमध्ये काल ‌सायंकाळी दिसून आला.

आधुनिक युगात दिवसेंदिवस दिवस बैलांची संख्या कमी होत चालले आहे. दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे मानाच्या बैलांबरोबर घोड्याचेही पुजन करण्यात आले. यावेळी उपसरपंच विष्णुपंत काठे, माजी सोसायटी चेअरमन सोपान काठे, सुनिल काठे, किशोर विधाते, सुभाष नेहरे, योगेश तिडके, राहूल काठे आदी.

आडगाव (नाशिक) येथील पोळा

सिन्नर: बैल पोळ्यानिमित्त बैलांची सजावट करताना आमदार राजाभाऊ वाजे

घोटवीरा (ता. पेठ) येथील बैलपोळा (छाया : नंदराज चौधरी)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!