Type to search

Featured नाशिक

मिळकतीचा बनाव प्रकरणी चौघांं विरोधात गुन्हा

Share

नाशिक | प्रतिनिधी

मिळकतीचा खोटा व बनावटी विकसन करारनामा तयार करून प्रकरण मिटवण्यासाठी 50 लाखाची खंडणी व सदर जमिनीत निम्मा हिस्सा द्यावा अन्यथा जीवे ठार मारू असा दम जमिन मालकास देणारया चार संशयितांन विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, महाराजकृष्ण बन्सीलाल बिरमाणी (75, रा. देवळाली कॅम्प) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. बिरमाणी यांच्या बहिणीने पाथर्डी शिवारात जमिन खरेदी केली होती. बहिणीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूपत्रानुसार सदरची जमिन बिरमाणी यांच्या नावावर होणार होती. त्यानुसार बहिणीच्या मृत्यूनंतर बिरमाणी यांनी या जागेच्या विकासासाठी प्रयत्न सुरु केला.

त्यावेळी अरूण धोंडू पाटील (रा. गंगापूर), महेश गंगाधर गुंजाळ, संतोष रामसिंग, विलास किसन मोरे यांनी ही जागा आम्हाला विकसित करण्याचा दस्त लिहून देण्यात आला असून तुम्ही आम्हाला पन्नास लाख रूपये या मिळकतीत निम्मा हिस्सा द्यावा अन्यथा आम्ही तुम्हाला जीवे ठार मारु असा दम दिला.

त्यानंतर बिरमानी यांनी या कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी कागदपत्रे दाखविली नाही. यानंतर याप्रकरणी न्यायालयात दावा दाखल करण्यात आला असून या दाव्यातील कागदपत्रे पाहिले असता, त्यावर खोट्या सह्या असून ते केवळ एका स्टॅम्पपेपरव करण्यात आले आहे. त्यामुळे खोटे दस्तऐवज केल्याचा दावा बिरमाणी यांनी केला आहे.

खोटे दस्तऐवज असतांनाही थेट पन्नास लाखाची मागणी करून जीवेठार मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात भादवी कलम 420,468,471,384, 386, 34,नुआर गुन्हा दाखल करण्यात आला असुन. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आजिनाथ मोरे अधिक तपास करीत आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!