Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

लाच घेतांना एमपीसीबीचे दोघे जाळ्यात

Share

नाशिक । प्रतिनिधी

खडीक्रशर मशीन चालवण्याचा परवाना देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून 10 हजार रुपयांची लाच घेणार्‍या महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.

क्षेत्रीय अधिकारी तथा अतिरीक्त कार्यभार उपप्रादेशिक अधिकारी प्रकाश निवृत्ती धुमाळ व क्षेत्रीय अधिकारी दिनेशभाई भिका वसावा अशी दोघा संशयित लाचखोरांची नावे आहेत.
तक्रारदाराने घोटी येथील खडीक्रशर मशीन चालवण्याचा परवाना मिळवण्यासाठी प्रदुषण नियंत्रण मंडळात अर्ज केला होता.

मात्र परवाना देण्याच्या मोबदल्यात प्रकाश धुमाळ यांनी तक्रारदाराकडे 10 हजार रुपयांची तर दिनेशभाई वसावा याने 15 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर विभागाने सापळा रचला.

गुरुवारी (दि.19) सातपूर येथील प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयातच धुमाळ यांनी लाचेची रक्कम स्विकारली. याबाबत संशयितांवर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!