Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या

वकिली करतानां राजकारणात आलेल्या अरूण जेटलींचा जीवनप्रवास

Share

वृत्तसंस्था:

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे नुकतेच निधन झाले आहे. दिल्ली येथील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अरुण जेटली 66 वर्षांचे होते.

जेटली हे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. नुकतीच त्यांच्यावर किडणी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियाही त्यांच्यावर करण्यात आली होती. दरम्यान प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिल्लीतील एम्स रुग्णालयात 9 ऑगस्टपासून यांना दाखल करण्यात आले होते.

२८ डिसेंबर १९५२ मध्ये अरुण जेटली यांचा जन्म झाला. त्यांनी दिल्लीत प्राथमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण घेतले होते. कॉमर्स शाखेतील पदवी घेतल्यानंतर त्यांनी कायद्याची पदवी घेतली होती. अरूण जेटलींनी विद्यार्थी दशेत सक्रीय होऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेततून राजकारणात भाग घेतला होता.

विद्यार्थी परिषदेचे दिल्लीचे अध्यक्ष आणि पुढे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणूनही काम पाहिले होते. अरूण जेटली भारतीय युवा मोर्चाचेही अध्यक्ष होते. कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी काही काळ देशातील अनेक उच्च न्यायालयात वकिली केली होती.

१९८९ मध्ये त्यांची अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. १९९० मध्ये त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने वरिष्ठ वकिलाचा दर्जा मिळाला होता.

आणीबाणीत तुरुंगवास

१९७५-७७ मध्ये आणीबाणीच्या काळात अरूण जेटलींनी तुरुंगवास भोगला आहे. आणीबाणीत त्यांना आधी अंबाला आणि नंतर दिल्लीच्या तिहार तुरुंगात टाकण्यात आले होते. त्यानंतर त्यांची अभाविपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी आणि अभाविपच्या दिल्ली प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ते भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष होते.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!