Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

देशात समान नागरी कायदा लागू करा- उद्धव ठाकरे

Share

मुंबई | वृत्तसंस्था

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाला शिवसेनेच्या गाण्याने सुरुवात झाली. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी विधानसभेवर भगवा फडकवणार असा दावा केला आहे. सोबतच, या एकाच महिन्यात दोन विजयादशमी साजऱ्या केल्या जाणार आहेत. एक विजयादशमी दसऱ्याला साजरी होत आहे आणि दुसरी विजयादशमी आता 24 ऑक्टोबरला साजरी करू असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. यातच 24 तारखेला विधानसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत.

अजित पवारांचे थेट नाव घेऊन उद्धव यांनी फटकेबाजी केली. उद्धव ठाकरे म्हणाले, “मगरीला अश्रू येतात हे ऐकले होते. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांना अश्रू आल्याचे पाहिले. अजित पवार कथितरित्या राजकारण सोडून शेती करण्याचा सल्ला देत आहेत. धरणात पाणीच आले नाही तर काय करणार बरं? ज्यावेळी तुमची सत्ता होती त्यावेळी धरणात पाणी नसताना तुम्ही केलेले विधान आठवते काय? आता अश्रू कसे काय आले.” केवळ अजित पवारच नव्हे, तर शरद पवारांवर सुद्धा उद्धव यांनी आपल्या भाषणातून टीका केली. ईडीची चौकशी होते तेव्हा सूडाचे राजकारण होत असल्याचे आरोप केले जातात. ज्यावेळी तुमची सत्ता होती तेव्हा सामनातील अग्रलेख पाहून का अटक केली होती. शिवसैनिकांवर का कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी सूडाचे राजकारण झाले नव्हते का? अशी विचारणा उद्धव यांनी केली.

ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सर्व बाजूंनी टीका केली आहे. जो पर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी त्यांचे वैर असणार तोपर्यंत आमचेही त्यांच्याशी राहील. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी एका सभेत बोलताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित येणार आहेत. दोन्ही पक्ष थकले असे विधान केल्याचे वृत्त आहे. त्यावरच प्रतिक्रिया देताना तुम्ही असे काय करून थकला आहात. नेमके केले तरी काय? भ्रष्टाचार आणि खाऊन-खाऊन थकलात का? असा खोचक सवाल उद्धव यांनी केला.

उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात भाजपवर अप्रत्यक्ष टीका करताना मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेसह तमाम जनतेची मागणी आहे, की अयोध्येत राम मंदिर व्हावे. परंतु, या मंदिरासाठी मते मागणे योग्य नाही. दिलेली वचने पाळायला हवीत असे म्हणताना त्यांनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. सोबतच, या देशात आपल्या मातीवर प्रेम करणारे देशभक्त मुसलमान आहेत. मुस्लिमांशी आमचे काहीच वैर नाही. शिवरायांच्या दरबारात सुद्धा कित्येक मुस्लिम होते असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. शिवरायांचा महाराष्ट्र हा कुणाची लाचारी करणारा नाही.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार

एका रुपयात आरोग्य चाचणी

10 रुपयांत पोटभर जेवण देणार

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बस देणार

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!