Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

भाडेकरूंची माहिती लपवल्या प्रकरणी तीन घरमालकांन विरुध्द गुन्हा दाखल

Share

इंदिरानगर | वार्ताहर

भाडेकरूंची माहिती लपवल्या प्रकरणी वडाळागाव येथील तीन घरमालकान विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मदिना नगर वडाळा गावात भाडेकरूंची माहिती (दि. 15) पोलीस घेत असताना तीन घर मालकांनी कुठल्याही प्रकारे पोलीस ठाण्यात भाडेकरूंची नोंद केलेली आढळली नाही. या प्रकरणी वसीम मुस्तफा कोकणी (वय 33) रा. कोकणीपूरा, जुने नाशिक. रोशन इफ्तिकार अली सय्यद (वय 39) सालार प्लाजा, पखाल रोड.

आणि रियाज आयुब शेख (वय 44) राजेश बंगला रोड, माजदा यांच्याविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात भादवी कलम 188 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर कार्यवाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नी आबा पाटील (गुन्हे) पो.उ.नी शेख, स.पो.नी राम जाधव सचिन सोनवणे, शेख, भगवान शिंदे , टोपले, रियाज शेख, यांच्या पथकाने केली अद्याप पर्यंत भाडेकरूंची नोंद न केलेल्या घरमालकांनी त्वरित नोंद करावी असे आव्हान इंदिरानगर पोलिसांनी केले आहे

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!