Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

रक्तदान : ब्लड बँकेसाठी नियमावली

Share
रक्तदान : ब्लड बँकेसाठी नियमावली, Latest News Blood Donation Blood Bank Rules Ahmednagar

अहमदनगर (प्रतिनिधी)- रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी नगरकरांनी ठिकठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प सुरू केले आहे. कोरोनाचा लढा जिंकण्यासाठी लागू केलेल्या नियमांचे पालन करण्यासोबतच कलेक्टरांनी नियमावली घालून दिली आहे. रक्तदात्यांची होणारी गर्दी टाळावी हा त्यामागील उद्देश असल्याचे कलेक्टर राहुल द्विवेदी यांनी सांगितले.

रक्तपेढ्या आणि काही सामाजिक संस्था रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यासंदर्भात परवानगी मागत आहेत. त्याअनुषंगाने रक्तदान करण्याची व्यवस्था असलेल्या रक्तपेढी किंवा रुग्णालयांमध्ये रक्तदात्यांची होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आदेश काढत शिबिरे आयोजित करणान्यासाठी नियमावली आखून दिली आहे.

रक्तदात्यांनी केवळ रक्तपेढीमध्येच रक्तदान करावे. रक्तपेढीमध्ये एका वेळी केवळ पाच रक्तदात्यांना प्रवेश द्यावा. रक्तदात्यास मागील ३ आठवड्यात कोणत्याही प्रकारचे संक्रमण झालेले नसावे. रक्तदात्याची मागील एक महिन्यात कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया झालेली नसावी. रक्तदात्याने रक्तदानापूर्वी जेवण किंवा अल्पोपहार घेतलेला असावा, रक्तदात्याचे वय शक्यतो १८ ते ६० वर्षादरम्यान आणि वजन किमान ५० किलो असावे. रक्तदात्याच्या मागील रक्तदानापासूनचा कालावधी ३ महिन्यापेक्षा अधिक असावा, रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण १२.५ पेक्षा कमी नसावे, असे कलेक्टरांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमीवर विशेष खबरदारी म्हणून विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, रक्तदान शिबिर आयोजकांनी संबंधित रक्तपेढीकडे रक्तदात्यांची नाव आणि मोबाईल क्रमांकानुसार यादी सादर करावी. रक्तपेढीद्वारे रक्तदात्यांना पासेसचे वितरण करावे आणि आवश्यकतेनुसार रक्तदात्यांशी संपर्क साधून त्यांना रक्तपेढीतच रक्तदानासाठी बोलवावे.

एका वेळेस जास्तीत जास्त पाचच रक्तदात्यांना रक्तदानासाठी बोलवावे. विशेष खबरदारी म्हणून रक्तदात्याने मास्क आणि रुमाल लावून रक्तपेढीत यावे. रक्तपेढीमध्ये हात धुण्याची व्यवस्था करावी आणि रक्तदात्यास हात स्वच्छ धुवून येण्याबाबत सूचना द्याव्यात. रक्तपेढीमध्ये उपस्थित सर्व व्यक्तींमध्ये किमान ६ फूटांचे अंतर असावे. रक्तदाता विदेश प्रवास करुन आलेला नसावा. रक्तदात्यांची कोरोना संबंधित स्त्राव चाचणी झालेली नसावी. तसेच मागील तीन आठवड्यात कोरोनाशी संबंधित लक्षणे नसावीत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!