Type to search

Featured नाशिक

Video: ब्लास्टर फाऊंडेशन तर्फे वाहतूक पोलिसांचा सत्कार

Share

सातपूर । प्रतिनिधी

सणावाराच्या काळात नागरीकांना उत्सवाचा आनंद घेता यावा या उद्दशाने स्वत:च्या कुटूंंबाच्या आनंदाला दुय्यम स्थान देत सेवा बजावण्याला प्राधान्य देणार्‍या वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचार्‍यांचा सत्कार नाशिकच्या ‘ब्लास्टर फाऊंडेशन’च्या वतीने करण्यात आला.
कोणत्याही सण उत्सवाच्या काळात वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांना घरचा सण सोडून रस्त्यावरची लढाई लढावी लागत असते. या पार्श्वभूमीवर त्यांच्या या कार्याची दखल घेत ब्लास्टर फाऊंडेशन’ च्या वतीने या पोलिस कर्मचार्‍यांना स्मृती चिन्ह व तूळशीचे रोप भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

या उपक्रमाचा शुभारंभ पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या सत्कारातून करण्यात आला. शहरभरातील सुमारे 300 पोलिस कर्मचार्‍यांचा हा सत्कार करण्यात आला. अनपेक्षितपणे कोणीतरी आपल्या कार्याची दखल घेत असल्याने त्याबाबत पोलिस कर्मचार्‍यांनी या वेळी समाधान व्यक्त केले.

या उपक्रमात ब्लास्टर फाऊंडेशनचे हिमेश पाटील, सुमंत भांगडिया, हर्षद मेर, विकास वाघमारे, यश कासट, प्रथमेश लोहगावकर, दिशा देसाई, मानसी पाटील, सूरज काबरा, सचिन चौहान, राहुल विश्वकर्मा, तन्मय झवर, सागर मुंदडा, अक्षय जोशी, विशाल घोटेकर, ओवी मुंदडा, प्रिया जोशी, निकिता कांकरिया, समीक्षा मुंदडा, ईश्वरी चांडक आदींसह पदाधिकार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!