Type to search

भाजपच्या शहराध्यक्षपदासाठी पारखी यांचा चेहरा पुढे

Share
भाजपच्या शहराध्यक्षपदासाठी पारखी यांचा चेहरा पुढे, Latest News Bjp City President Parkhi Name Compition Ahmednagar

अहमदनगर (प्रतिनिधी) – भाजपच्या नगर शहरजिल्हाध्यक्ष पदासाठी माजी नगरसेवक सचिन पारखी यांचा ‘फेस’ पुढे करत माजी खासदार दिलीप गांधी यांना शह दिला जाणार आहे. त्यासाठी पारखींना ताकद देण्याच्या सुप्त हालचाली भाजपातंर्गत गांधी विरोधकांकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून समजली.

नगर शहरजिल्हाध्यक्ष पदाचा चान्स नवतरुणांना द्यावा अशी मागणी करत गांधी यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी आतापासूनच मोट बांधण्यास सुरूवात केली आहे. पक्ष निवडणूक अधिकार्‍यांची मान्यता न घेताच भिंगार मंडलाध्यक्ष नियुक्ती करण्यात आल्याचा आक्षेप घेत गांधी यांची कोंडी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

माजी खासदार दिलीप गांधी हे भाजपचे नगर शहरजिल्हाध्यक्ष आहेत. पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. नगर शहरजिल्हाध्यक्ष पदाचा चान्स नवतरुणांना द्यावा अशी मागणी करत गांधी यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी आतापासूनच मोट बांधण्यास सुरूवात केली आहे. पक्ष निवडणूक अधिकार्‍यांची मान्यता न घेताच भिंगार मंडलाध्यक्ष नियुक्ती करण्यात आल्याचा आक्षेप घेत गांधी यांची कोंडी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

माजी खासदार दिलीप गांधी हे भाजपचे नगर शहरजिल्हाध्यक्ष आहेत. पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. तालुकाध्यक्षांच्या निवडणुका झाल्या असून काही ठिकाणी वाद झाल्याने नियुक्ती प्रलंबित राहिली आहे. आता नगर शहरातील चार मंडलाध्यक्षांच्या अन् त्यानंतर शहरजिल्हाध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे.

नगर शहरात केडगाव, भिंगार, सावेडी आणि मध्य शहर अशी चार मंडल आहेत. मंडलाध्यक्ष निवडीवरून गतवर्षी दिलीप गांधी आणि अ‍ॅड अभय आगरकर यांच्यात राजकीय संघर्ष झाला होता. यंदाही तशीच शक्यता गृहीत धरून विद्यमान शहरजिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी मंडलाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम सुरू केला.

भिंगारला वसंत ठुबे या समर्थकांची मंडलाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र ही निवडणूकच बेकायदेशीर असल्याचा आरोप गांधींच्या पक्षांतर्गत विरोधकांनी केला आहे. मंडलाध्यक्षांची निवडणूक घेण्यासाठी पक्षाने नियुक्त केलेल्या निवडणूक अधिकार्‍याची परवानगी लागते, ती न घेताच निवड कशी केली? असा सवाल करत गांधी यांची कोंडी केली जात असल्याचे सूत्रांकडून समजले.

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!