Thursday, April 25, 2024
Homeनगरश्रीगोंदा : भानगावमध्ये बोगस डॉक्टरवर कारवाई

श्रीगोंदा : भानगावमध्ये बोगस डॉक्टरवर कारवाई

50 हजारांच्या मुद्देमालासह मुन्नाभाई ताब्यात

श्रीगोंदा (प्रतिनिधी)– तालुक्यातील भानगाव मध्ये अनेक वर्षांपासून महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा वैद्यकीय परवाना नसताना खुलेआम रुग्णालय चालवत रुग्णावर औषधोपचार करत असलेला मुन्नाभाई गोपाल विश्वास कडे याचा व्यवसाय सुरू होता; मात्र याबाबात जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांकडे तक्रार दाखल होताच श्रीगोंदा पोलिसांच्या पथकासह तालुका आरोग्य अधिकार्‍यांनी या बोगस डॉक्टर गोपाल विश्वासच्या भानगाव रुग्णालयात छापा घातला. तिथे तब्बल 50 ते 55 हजार रुपयांचा औषधसाठा सापडला आहे. त्याला श्रीगोंदा न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

एक बाजूला शहरात डॉक्टरांची संख्या वाढत असताना ग्रामीण आणि दुर्गम भागात मात्र डॉक्टर आपली सेवा देण्यास प्राधान्य देत नसल्याने अनेक खेडेगावांत आरोग्यासाठी जागृती करण्याची पदवी किंवा एक दोन महिन्यांचा कोर्स करून आपण डॉक्टर असल्याचे भासवून परप्रांतातील लोक खेडेगावांत रुग्णालय थाटत आहेत. अनेक वेळा चुकीचे उपचार करून रुग्णाच्या जीवावर बेतत असताना असे बोगस मुन्नाभाईवर कारवाई होत नाही. तालुक्यातील भानगाव मध्ये काही वर्षांपासून असा परवाना नसताना वैद्यकीय व्यवसाय करणारा पश्चिम बंगालमधील बोगस मुन्नाभाई गोपाल विश्वासच्या विरोधात ग्रामस्थांनी जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांकडे तक्रार केली होती.

भानगावमध्ये परवाना नसताना आणि वैद्यकीय डिग्री नसताना गोपाल विश्वास नावाचा बोगस डॉक्टरवर श्रीगोंद्याचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश गावित, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला असता या बोगस डॉक्टर कडे वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसल्याचे आढळले. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची औषधे तसेच सलाईन बाटल्या इंजेक्शन देण्याचे साहित्य असे 53 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबात रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.

परवाना नसताना मोठ्या प्रमाणात औषधे
डॉक्टरला वैद्यकीय सेवा देण्याचा परवाना नसताना त्याला कुणी औषधे दिली? कुठल्या मेडिकल दुकानात परवाना नसताना अषधांची विक्री करण्यात आली याचीही चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या