Thursday, April 25, 2024
Homeनगरबँक कर्जाचे हप्ते 6 महिने स्थगित करावे – ना. थोरात

बँक कर्जाचे हप्ते 6 महिने स्थगित करावे – ना. थोरात

मुंबई- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्याने शेतकरी, व्यापारी, नोकरदार सर्वच त्रासात आहेत, आशा परिस्थितीत सर्व प्रकारच्या कर्जाचे हप्ते (ईएमआय) सहा महिने स्थगित करावेत ही आमची प्रमुख मागणी आहे.
रिझर्व्ह बँकेने आज दिलेला सल्ला म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
रिझर्व्ह बँकेने सल्ला देण्यापेक्षा सर्व बँकांना स्पष्ट सूचना द्याव्यात आणि सहा महिने ईएमआय थांबवावेत, हे करतांना केंद्र सरकारने बँकांनाही कशी मदत करता येईल याबाबतीत सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
https://www.facebook.com/sarvmat/videos/639831356582390/?t=25
- Advertisment -

ताज्या बातम्या