बंधारे भरण्यासाठी मुळा नदीत पाणी सोडण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे आदेश

jalgaon-digital
1 Min Read

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा प्रयत्न

नेवासा (तालुका प्रतिनिधी)- जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे प्रयत्नाने बंधारे भरण्यासाठी उद्या सकाळी (दि.27 मार्च) मुळा नदी पात्रात पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी दिले आहेत.

मुळा नदीवरील तीनही बंधारे भरून देण्यासाठी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे पाठपुरावा केला, त्यास यश मिळाले असून उद्या शुक्रवार दि.27 मार्च रोजी सकाळी 6 वाजता मुळा धरणातून 500 क्युसेसने मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे.

मुळा नदीवरील तिन ही कोल्हापूर पद्धतीचे बंधार्यांसाठी मुळा धरणातून विसर्ग सोडण्यात येत आहे. हा विसर्ग टप्प्या टप्प्याने विसर्ग वाढवून तो 2000 क्यूसेकस् करण्यात येईल. को. प. बंधारे भरण्यासाठी एकूण 550 दलघफू पाणी लागण्याची शक्यता आहे.

Share This Article