अशोक कारखाना निवडणूक एकास एक लढणार; शेतकरी संघटनेच्या बैठकीत निर्णय

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक सर्व विरोधी गटांना एकत्रित करून एकास एक पॅनलद्वारे लढविण्यास प्राधान्य देण्यात येईल, असा निर्णय शेतकरी संघटनेच्या समर्थक व कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

जिल्ह्यात व राज्यात उसाला सर्वाधिक भाव देण्याची व नि:स्वार्थी कारभार करण्याची क्षमता फक्त शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात असल्याने मागील पंचवार्षिक प्रमाणे शेतकरी संघटनेने पुढाकार घेऊन निवडणुकीस सामोरे जाताना एकास एक पॅनलसाठी प्रयत्नशील रहावे, सर्व विरोधी गटांना एकत्र करून सक्षम पर्याय द्यावा, यावेळी परिवर्तन अटळ आहे असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच टाकळीभान, कारेगाव, वडाळा महादेव, उंदीरगाव, बेलापूर-पढेगाव याठिकाणी कारखाना गटांच्या गावात प्रसिद्ध झालेल्या सभासद मतदारांच्या प्रारुप याद्या गटातील गावकर्‍यांनी तपासून घ्याव्यात असे आवाहन करण्यात आले.

अ‍ॅड. सर्जेराव कापसे यांचे श्रीरामपूर येथील निवासस्थानी झालेल्या बैठकीस शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब पटारे, शेतकरी युवा आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. अजित काळे, कृषिभूषण माऊली पवार, विष्णुपंत खंडागळे, बळीराजा पार्टीचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ तुवर, शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक युवराज जगताप, अ‍ॅड. सर्जेराव घोडे, विठ्ठल सोनवणे, कार्लस साठे, शहाजी कोकणे, रमेशराव उंडे, शिवाजीराव कवडे, भास्करराव तुवर, बाळासाहेब शिरसाठ, बाळासाहेब दोंड, लक्ष्मणराव पिसे, कैलास पवार, नंदकुमार तर्‍हाळ, निवृत्ती पवार, बबनराव उघडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *