Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

शिर्डी, राहाता, कोपरगाव, लोणीत 28 आरोपींना अटक, 44 जणांना समन्स

Share
वडझिरे गोळीबार प्रकरण; आरोपीच्या मुसक्या आवळल्या, Latest News Vadzhire Criminal Arrested Parner

शिर्डी (प्रतिनिधी)- शिर्डी उपविभागीय कार्यालयाच्या क्षेत्रात शिर्डी, राहता, कोपरगाव, लोणी या शहर व ग्रामीण हद्दीत मोठी कारवाई करून 28 आरोपींना अटक करण्यात आली. 13आरोपींना वॉरंट बजावण्यात आले. 46 जणांवर समन्स कारवाई करण्यात आली.
जिल्हा पोलीस प्रमुख सागर पाटील अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई करण्यात आली.

कोपरगाव व राहाता तालुक्यातील अजामीनपात्र असलेले आरोपी सुनील बाबुराव मोकळ , ज्ञानेश्वर उर्फ पिट्या पवार, डोगर्‍या शिवराम चव्हाण, राहुल चव्हाण, राहुल राजेंद्र कोपरे, इमरान कौसर शेख, अनिल राजू कांबळे, दत्तू सावळेराम पवार, महेश बाळासाहेब त्रिभुवन, किरण सुभाष साळवे, अर्जुन जनार्दन नाईक, अनिल एकनाथ कदम, दत्तु गोकुळ देसाई, मधुकर सोपान वाटे, सोमनाथ दशरथ चंदनशिव, यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले व अटक करण्यात आली आहे.

पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध सुरू असताना गणेश कचरू लोखंडे, शैलेश सर्जेराव शेलार, चेतन सुनील शिरसाठ, आदित्य रवींद्र गरुड, अभिषेक वसंत शिंदे, विशाल रामानंद पिंगळे, दत्तु शामराव साबळे, राहुल सोमनाथ गायकवाड, शरद गंजानन भोसले सर्व राहणार कोपरगाव, राहाता परीसर यांना अटक करण्यात आली आहे. भा. दं. वि. कलम 151अन्वये सुरेश यशवंत गायकवाड रा वेस, बाळासाहेब साहेबराव गायकवाड येवला, अनिल साहेबराव त्रिभुवन पिंपळवाडी, वसिम आयुब शेख रामपुर, बंबन मुरलीधर कुदळे नादुर्खी यांना अटक करण्यात आली आहे.

गुन्हा करण्याच्या तयारीत असलेला अमोल बाळासाहेब जाधव रा चांदेकसारे याला देखील कलम 122अन्वये अटक करण्यात आली आहे. तसेच 13 वॉरट बजावण्यात आले. 46 समन्स बजावणी करण्यात आली असून 12 सराईत अग्नीशस्त्र बाळगणारे सराईत गुन्हेगारांचा देखील शोध घेण्यात आला. जे सापडले त्यांना अटक करुन जेरबंद करण्यात आले. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर पोलीस मनुष्य बळाचा वापर करण्यात आला होता. यामागे कोणी पळुन जाऊ नये हा हेतू होता.

कारवाईप्रसंगी नाकेबंदी करण्यात आली होती त्यामुळे मोठ्या प्रमाणावर संशयित गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना ताब्यात घेता आले . या कारवाईची अंत्यत गोपनीयता बाळगल्यामुळे 28आरोपीना अटक करता आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, सहा. पोलीस निरीक्षक दिपक गंधाले , सुभाष मोरे, प्रकाश पाटील , सहा. पोलीस निरीक्षक दिपक बोरसे, मिथुन घुगे, संचिन इंगळे, प्रविण दातरे, सोनवणे , रूपवते, कढारे, सुर्यवशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

गंभीर गुन्ह्यांमध्ये असलेल्या आरोपींचा शोध जे सापडले त्याच्यावर कारवाई करुण अटक करण्यात आली असून जे फरार आहे त्याचा देखील शोध घेण्यात येत असून गुन्हेगारी मोडुन काढण्यासाठी पोलिस प्रशासन धोरणात्मक नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!