Thursday, April 25, 2024
Homeनगरश्रीगोंदा : आढळगाव येथील खून प्रकरणी एक आरोपी ताब्यात

श्रीगोंदा : आढळगाव येथील खून प्रकरणी एक आरोपी ताब्यात

अनैतिक संबंधाच्या कारणातून घात झाल्याचे स्पष्ट

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) – श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील मुकुंद जयसिंग वाकडे (वय 28 वर्षे रा. आढळगाव) या युवकाचे गळा, छाती, दोन्हीही हाताच्या पंजावर आणि गुप्तांगावर धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आला. या खुनाचा तपास पोलीस यंत्रणेने तातडीने करुन आरोपीला जेरबंद केले. अनैतिक संबंधातून हा प्रकार घडला असून पूर्वनियोजित कट करून खून करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार यांनी घटनास्थळी भेट दिली.

- Advertisement -

याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील शनिवार दि. 2 मे रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास मुकुंद जयसिंग वाकडे हा ट्रॅकटरच्या सहाय्याने स्वतःच्या मालकीची शेतजमीन गट नं. 133/1 मध्ये डाळिंबाचे पिकावरती फवारणी करण्याकरिता गेला होता. याच वेळी आरोपी त्याचा मित्र दत्तात्रय अंकुश पठाडे या ठिकाणी आला होता. इथे त्यांनी ट्रॅक्टरच्या सह्याने फवारणी केली. मात्र काही वेळात संधी पाहून आरोपी दत्तात्रय याने धारधार शस्र काढून मयत मुकुंदच्या गळ्यावर छातीवर वार केला.

या वेळी मुकुंद पळून जात होता. मात्र पुन्हा त्याला पायाला ओढून वार केला. यानंतर गुप्तांगावर देखील वार केला. यात तो जागीच मृत पावला असल्याचे पाहून आरोपी निघून गेला. त्याने रक्ताने भरलेले अंगावरील कपडे, हत्यार गुंडाळून एका विहिरीत टाकले.

आरोपी हा दुसर्‍या दिवशी मृत मुकुंदचा मृतदेह पाहण्यासाठी तिथे आला होता. अंत्यसंस्कार प्रसंगी देखील तिथेच होता. आरोपी दत्तात्रय पठाडे याचे अनैतिक संबंध असल्याचे मयत मुकुंद याला माहित झाल्यानंतर मयत मुकुंदनेही ब्लॅकमेल करून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुकुंद वाकडे याला मारण्याच्या उद्देशाने धारधार शस्त्राने वार करून दत्तात्रय याने मुकुंदला ठार मारले.

जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार, संदीप मिटके, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, पोलीस मात्र सोमवार दिनांक 4 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीगोंदा पोलीस निरीक्षक यांच्या संयुक्त तपास मोहिमेत आरोपींपर्यंत धागेदोरे पोहचले. दुपारी आरोपीला त्याच्या शेतात गोठ्यात झोपला असताना ताब्यात घेण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या