Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

सुगंधी तंबाखुच्या गोडावूनवर छापा

Share
सुगंधी तंबाखुच्या गोडावूनवर छापा, Latest News Aromatic Tobacco Raid Ahmednagar

अन्न व औषध प्रशासनाने पकडला 52 हजारांचा गुटखा

अहमदनगर (प्रतिनिधी) – अन्न व औषध प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयसमोरच राजरोसपणे सुरू असलेल्या सुगंधी तंबाखुच्या गोडावूनवर छापा घातला आहे. या छाप्यात अन्न व औषध प्रशासनाने सुमारे 52 हजार 692 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गोडावून सील केले आहे. नावेद तांबोळी यांचे ते गोडावून आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या एका इमारतीमधील गाळ्यातून सुगंधी तंबाखुची विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संजय शिंदे (अन्न) यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी ही कारवाई केली.

नावेद तांबोळी (रा. डावरेगल्ली) याच्या ताब्यात ही सुगंधी तंबाखू आढळून आली. राज्य सरकारने बंदी घातलेल्या सुगंधी गुटखा, मिक्सपद्धतीने तयार केलेली सुगंधी तंबाखू आदी मुद्देमाल येथे आढळून आला. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी हे गोडावून सील केले आहे.अशी माहिती शरद पवार यांनी दिली.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!