Saturday, April 27, 2024
Homeनगरलष्करी अधिकार्‍यांनी घेतला करोनाच्या उपाययोजनांचा आढावा

लष्करी अधिकार्‍यांनी घेतला करोनाच्या उपाययोजनांचा आढावा

पोलीस अधीक्षक कार्यालयात बैठक : कामगिरीचे केले कौतूक

अहमदनगर (प्रतिनिधी) – भारतीय सैन्य दलाचे नगर येथील बिग्रेडीअर विजय राणा व कर्नल ओ. पी. शर्मा यांनी नगर जिल्हा पोलीस दलाबरोबर बैठक घेऊन करोना विषाणुचा प्रार्दुभाव रोखण्याकरीता करत असलेल्या कार्याचा आढावा घेतला. पोलीस अधीक्षक कार्यालयातझालेल्या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील, आर्थिक गुन्हे शाखेच्या उपअधीक्षक प्रांजली सोनवणे, शहर उपअधीक्षक संदीप मिटके व इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisement -

बिग्रेडीअर विजय राणा व कर्नल ओ. पी. शर्मा यांनी अहमदनगर जिल्हा पोलीस दल कोराना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्याकरीता करत असलेले कामाचे स्वरुप, त्यामध्ये सर्व बंदोबस्ताकरीता पोलीस अधिकारी व कर्मचारी वॉकीटॉकीव्दारे एकमेकांशी व पोलीस नियंत्रण कक्ष, कामाचे अनुशंगाने साधत असलेले समन्वय, जिल्हयातील 21 नाकाबंदी चेक पोस्ट कामकाज,

अहमदनगर जिल्हा पोलीस दलाचे सामाजिक जबाबदारीच्या बांधलकीतून केलेले अन्न धान्य, जेवण व अत्यावश्यक साहित्य वाटप, सायबर पोलीस स्टेशनचे सोशल मीडियावरील नियंत्रण, पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना करोनाचा प्रार्दुभाव रोखण्याकरीता दिलेले संरक्षणात्मक साहित्य, जिल्हयातील हॉटस्पॉट व इतर ठिकाणी ड्रोन कॅमेराव्दारे नजर ठेवून केलेली कार्यवाही आदी माहिती यावेळी देण्यात आली. ब्रिगेडीअर विजय राणा यांनी जिल्हा पोलीस दल करोना नियंत्रणासाठी करत असलेल्या सक्रिय कामाबाबत कौतूक केले. जिल्हा पोलीस दलाचा देशाला अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया यावेळी त्यांनी व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या