Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरएप्रिल फुल… दांडी होईल गुल

एप्रिल फुल… दांडी होईल गुल

पोलिसांची करडी नजर; व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमीनवर कारवाई

अहमदनगर (प्रतिनिधी) – एप्रिल फुलचा मेसेजवर पोलिसांची करडी नजर असून चुकनही मेसेज पडला तर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमीनची दांडी गुल होणार आहे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारा मेसेज व्हायरल झाला तर पोलीस भारतीय दंड संहिता 188 कलमान्वये गुन्हा दाखल करणार आहेत. तसे आदेश सिटी डीवायएसपी संदीप मिटके यांनी काढले आहेत.

- Advertisement -

1 एप्रिलला मित्र परिवार, नातेवाईकांना एप्रिल फुल करण्याची पध्दत आपल्याकडे आहे. त्यातून वेगळ्या प्रकारचा आनंद मिळत असतो. सद्यस्थितीवर आपल्याकडे कोरोना व्हायरसचे संकट असून संचारबंदी आहे. कोरोना व्हायरसच्या संदर्ााने लोकांमध्ये सा्ंरमावस्था निर्माण होऊन संचारबंदीचे उल्लंघन होणार नाही अशा कोणत्याही प्रकारचे मेसेज टाकू नये. सोशल मीडियावर व्हायरल करू नये.

नगरकर सूज्ञ नागरिक असून त्यांच्याकडून असे कोणतेही कृत्य होणार नाही अशी अपेक्षा आदेशात डीवायएसपी संदीप मिटके यांनी व्यक्त केली आहे. चुकूनही अशा प्रकारचे मेसेज व्हायरल करण्यास मेसेज टाकणारा ग्रुप मेंबर व व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिनवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 68 नुसार पोलिसांनी प्रतिबंध केले आहे. या आदेशाचे उल्लंघन केले तर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 140 तसेच भारतीय दंडसंहिता कलम 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची तंबी डीवायएसपी संदीप मिटके यांनी दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वाूमीवर बंद सुरू असून त्याबद्दल सा्ंरम निर्माण करणारा मेसेज टाकणारा व ज्या ग्रुपवर मेसेज आला त्या ग्रुपच्या अ‍ॅडमीनला जबाबदार धरले जाणार आहे. पोलिसांची दोन दिवस व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर करडी नजर असणार आहे.
– संदीप मिटके, डीवायएसपी

शेवगाव ( तालुका प्रतिनिधी ) – १ एप्रिल रोजी कोणीही सोशल मिडियावर कोरोना व्हायरसच्या संदर्भान्वये कोणत्याही प्रकारचे लोकांमध्ये संभ्रम निर्माळ करतील अशा प्रकारचे मेसेज टाकुन नये असे आवाहन शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी केले आहे. अन्यथा मेसेज व्हायरल करणाऱ्या व ग्रुप अॅडमिनविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४० तसेच भारतीय दंड संहिता १८८ नुसार कायदेशीसर करण्याचा इशारा दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या