Thursday, April 25, 2024
Homeनगरज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सुरक्षेत वाढ

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सुरक्षेत वाढ

आ. आदित्य ठाकरेंनाही झेड सुरक्षा

मुंबई – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सुरक्षेत सरकारने वाढ केली आहे. त्यांच्यासोबतच शिवसेनेचे आ. आदित्य ठाकरे यांनाही झेड दर्जाची सुरक्षा दिली आहे.

- Advertisement -

राज्यातील महत्त्वाच्या 45 व्यक्तीच्या सुरक्षेत राज्य सरकारने नुकतेच बदल केले आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा व्यवस्था होती. त्यात वाढ करत आता त्यांना ‘झेड’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. सचिन तेंडुलकर यांच्या एक्स दर्जाच्या सुरक्षेतील सोबत चोवीस तास पोलीस कॉन्स्टेबल काढून घेण्यात आला आहे. यापुढे सचिनला पोलिस एस्कॉर्ट सुरक्षा व्यवस्था असणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना यापूर्वी वाय दर्जाच्या सुरक्षेसोबतच एस्कॉर्ट सुरक्षा देखील होती. आता खडसेंची एस्कर्ट सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.

शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पूर्वी त्यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा होती, आता ती ‘झेड’ असणार आहे. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांना असलेली ‘झेड प्लस’ सुरक्षा कमी करुन ‘एक्स’ दर्जाची करण्यात आली आहे.

अ‍ॅड. निकम यांना आता ‘वाय’ सुरक्षा
सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याही सुरक्षेत घट करण्यात आली आहे. निकम यांना असलेली ‘झेड प्लस’ सुरक्षा आता ‘वाय’ दर्जाची करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या