Friday, April 26, 2024
Homeनगरनगर – एम्सची इमारत प्रशासनाने घेतली ताब्यात

नगर – एम्सची इमारत प्रशासनाने घेतली ताब्यात

अहमदनगर – शहरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढल्यास ऐनवेळी प्रश्न निर्माण होऊ नयेत, यासाठी प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहर सहकारी बँकेचे कर्ज थकीत असल्याने बँकेने सील केलेले औरंगाबाद रस्त्यावरील एम्स हॉस्पिटल जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतले आहे.

जिल्हा प्रशासनाने ही इमारत महापालिकेच्या ताब्यात दिली आहे. महापालिकेने तेथे स्वच्छता करण्याचे काम सुरू केले आहे. स्वच्छतेनंतर ही इमारत जिल्हा रुग्णालयास देण्यात येणार आहे. बुथ हॉस्पिटलप्रमाणे येथेही आयसोलेशन रूम करण्यात येणार आहेत. कोरोना बाधित रुग्ण येथे ठेवले जाणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या