मनपा कर्मचार्‍यास मारहाण करणारे तिघे जेरबंद

मनपा कर्मचार्‍यास मारहाण करणारे तिघे जेरबंद

दोन दिवस पोलीस कोठडी

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने नागापूर परिसरात फवारणीचे काम सुरु असतांना दोन कर्मचार्‍यांना नगरसेविकेच्या नातेवाईकांसह 7 ते 8 जणांनी जबर मारहाण केली होती. मारहाण करण्यार्‍या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

मात्र त्यातील पाच आरोपी अद्यापही मोकाट असून त्याचा शोध पोलीस घेत आहे. प्रथमेश पाटोळे, गौरव भाकरे, अतुल भाकरे असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. त्यांना नागापूर परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले.

महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक सुरेश वाघ आणि अविनाश हंस या कर्मचार्‍यांना मारहाण करण्यात आली होती. याबाबत नगरसेविकेचा दीर आरोपी निलेश भाकरे व त्याचे 7 ते 8 साथीदार यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवन सुपनर या गुन्हाचा तपास करत आहे. उपनिरीक्षक सुपनर यांनी तीन आरोपींना जेरबंद केले असून त्यातील आणखी पाच आरोपींचा शोध घेत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com