Thursday, April 25, 2024
Homeनगरमहापालिकेत पॅचिंंग घोटाळा; निखिल वारेंचा आरोप

महापालिकेत पॅचिंंग घोटाळा; निखिल वारेंचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर शहरात महापालिकेने सुरू केलेल्या रोड पॅचिंग कामात घोटाळा झाल्याचा आरोप करत ठेकेदार आणि अधिकार्‍यांच्या संगनमताने हे होत असल्याची तक्रार माजी नगरसेवक निखिल वारे यांनी आयुक्तांकडे केली आहे. पॅचिंग करताना कारपेट न मारता केवळ बीबीएमवर काम भागवून लाखो रुपयांचे बिले काढल्याचा संशय वारे यांनी व्यक्त केला आहे.

पावसाळ्यापूर्वी नगर शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम महापालिका दरवर्षीच करते. प्रत्येक वर्षाला लाखो रुपयांचा खर्च त्यावर होतो. यंदाच्या वर्षी तर महापालिकेने तीन वेळेस रोड पॅचिंगचे काम केल्याचे सूत्रांनी सांगितले. लॉकडाऊनच्या काळात महापालिकेने शहरात पॅचिंगचे काम केले. हे काम करताना बीबीएम केल्यानंतर कारपेट करण्याचे मात्र टाळले आहे. केवळ बीबीएमचे काम करून लाखो रुपयांचे बिल ठेकेदाराने अधिकार्‍यांशी संगनमत करून मंजूर करवून घेतले आहे.

- Advertisement -

कारपेट न झाल्याने पावसळ्यात हे पॅचिंग वाहून जाणार आहे. नगरकर जनतेच्या पैशाचा हा अपव्यय असून ठेकेदाराचे बिल पावसाळा संपल्यानंतरच द्यावे असे वारे यांनी तक्रारीत म्हटले आहे. पावसळ्यात ठेकेदाराने केलेल्या कामाचा दर्जा दिसून येईल. तोपर्यंत त्यांचे बिल अदा करू नये, असे वारे यांचे म्हणणे आहे.

आयुक्तसाहेब करणार का चेकिंग…
दरवर्षी रोड पॅचिंगवर लाखो रूपयांची उधळपट्टी केली जाते. तीच तर ठेकेदारासाठी पर्वणी असते. त्यामुळेच नेहमीची येवो पावसळा असे तर ठेकेदारांना वाटत असते. महापालिकेचे इंजिनिअर, अधिकारी प्रत्यक्ष कामाची पाहणी न करता ठेकेदाराच्या बिलावर सही करतात. त्यामुळे पाहणी होत नसल्याने हा घोटाळा होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्याची पडताळणी आता आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना करावी लागणार आहे. त्याकडेच नगरकरांचे लक्ष लागून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या