Friday, April 26, 2024
Homeनगरधक्कादायक: रुग्णवाहिकेतून दारुची वाहतूक; तिघे गजाआड

धक्कादायक: रुग्णवाहिकेतून दारुची वाहतूक; तिघे गजाआड

जिल्हा रुग्णालयातील प्रकार
अहमदनगर (प्रतिनिधी) – करोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वजण अहोरात्र प्रयत्न करत आहे. मात्र, काही व्यक्तींना याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. चक्क जिल्हा रुग्णालयात रुग्ण वाहतूकीसाठी असलेल्या वाहनातून दारुची वाहतूक केली जास्त असल्याची धक्कादायक बाब आज उघडकीस आली.
तोफखाना पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली असून रुग्णवाहिका, एक दुचाकी व दारू असा दोन लाख 70 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वीरु प्रकाश गोहेर, रॉबिन जॉर्ज कोरेरा (दोघे रा. सिव्हिल कॉटर, नगर), संजय गंगाराम हंकारे (रा. रासनेनगर) असे अटक केलेल्या तिघांचे नावे आहेत.
- Advertisment -

ताज्या बातम्या