Wednesday, April 24, 2024
Homeनगरनगरमध्ये लॉकडाऊन काळात चोरट्यांचा दारूवर डल्ला

नगरमध्ये लॉकडाऊन काळात चोरट्यांचा दारूवर डल्ला

हॉटेल राजनंदिनी मधून एक लाखांची दारु लंपास 
अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने सर्वत्रच लॉकडाऊन केले असतांनाच नगर शहरातील तपोवन रस्त्यावरील राजनंदिनी हॉटेल अज्ञात चोरट्यांनी फोडले असून त्यामधून एक लाख आठ हजार रुपयांच्या दारुवर डल्ला मारला आहे.
तपोवन रस्त्यावरील प्रशांत निमसे यांचे राजनंदिनी हॉटेल आहे. रविवारी (दि.19) रोजी रात्री दोघा अज्ञात चोरट्यांनी हॉटेलच्या मागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यातील एक लाख आठ हजार रुपये किंमतीची दारू त्यांनी लंपास केली आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हारुण मुलाणी, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक सोळंखी हे घटनास्थळी दाखल झाले.
हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यामध्ये दोघे भामटे दारु चोरतांना दिसत आहे. तसेच घटनास्थळी श्‍वान पथक पाचारण करण्यात आले होते. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात हॉटेलचे मालक प्रशांत निमसे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- Advertisment -

ताज्या बातम्या