Thursday, April 25, 2024
Homeनगरमद्य जप्ती प्रकरण; संगमनेर पोलिसांची कारवाई संशयाच्या भोवर्‍यात !

मद्य जप्ती प्रकरण; संगमनेर पोलिसांची कारवाई संशयाच्या भोवर्‍यात !

संगमनेर (शहर प्रतिनिधी) – बेकायदेशीरित्या मद्याच्या बाटल्या जवळ बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी चार दिवसांपूर्वी केलेली कारवाई संशयाच्या भोवर्‍यात अडकली आहे. ही कारवाई तालुक्यातील खांडगाव परिसरात दाखवली असली तरी ही कारवाई शहरालगतच्या एका बारमध्ये करण्यात आल्याची चर्चा असल्याने या कारवाईला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

संगमनेर शहर पोलिसांनी दिनांक 20 एप्रिल रोजी खांडगाव पुलाजवळ श्रीरामपूरच्या अमित सोनवणे या युवकाला पकडून त्याच्याकडून सुमारे 9 हजार रुपयांची देशी-विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या होत्या. या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला. या कारवाईनंतर शहरातील अकोले रस्त्यावरील एका बार मालकालाही पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. कारवाई खांंडगाव येथे करण्यात आलेली असताना संगमनेरातील बार मालकाला पोलीस ठाण्यात का आणण्यात आले यावरून या कारवाईची उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

- Advertisement -

समजलेल्या माहितीनुसार पोलिसांनी ही कारवाई खांडगाव येथे न करता अकोले रस्त्यावरील एका बारमध्ये केली होती या कारवाईत दोघा जणांना पोलीस ठाण्यात आणले मात्र नंतर बार मालकास सोडून देण्यात आले व कारवाईचे ठिकाण फिर्यादीमध्ये वेगळेच दाखविण्यात आल्याची चर्चा आहे.

अर्थपूर्ण तडजोडीतून हा प्रकार झाल्याचे बोलले जात आहे. खांंडगाव येथे कारवाई केली तर मग अकोले रस्त्यावरील या बारचालकास पोलिस ठाण्यात का? आणण्यात आले होते. पोलीस अधिकार्‍यांचे लक्ष नसल्याने काही पोलिस कर्मचारी वेगवेगळे उद्योग करीत असल्याची चर्चा होताना दिसत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या