Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

अकोलेत सदिच्छा मंडळाला भगदाड

Share

शिक्षक संघ बरखास्त करून गुरुमाऊलीमध्ये प्रवेश

अकोले (प्रतिनिधी) – तालुक्यातील सदिच्छा मंडळ व शिवाजीराव पाटील प्रणित शिक्षक संघाची कार्यकारिणी बरखास्त करून सर्व पदाधिकार्‍यांनी बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखालील अहमदनगर जिल्हा गुरुमाऊली मंडळामध्ये काल प्रवेश केला. गुरुमाऊली मंडळाच्या वर्धापनदिनी हा सुखद धक्का अकोलेकरांनी जिल्ह्याला दिला.

बापूसाहेब तांबे यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली शिक्षक संघ आणि शिक्षक बँकेतील गुरुमाऊली मंडळाचा गेल्या चार वर्षांतील आदर्श कारभार पाहून आपण व आपल्या कार्यकर्त्यांनी गुरुमाऊली मंडळात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे बँकेचे माजी व्हाईस चेअरमन, सदिच्छा मंडळाचे नेते राजेंद्र सदगीर यांनी सांगितले.

अकोले येथील पेन्शनर संघटनेच्या कार्यालयात सदिच्छा मंडळ व शिवाजीराव पाटील प्रणित शिक्षक संघाच्या तालुका कार्यकारिणीचा मेळावा काल संपन्न झाला.त्यामध्ये सर्वानुमते दोन्ही कार्यकारिणी बरखास्त करून बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखालील गुरुमाऊली मंडळात प्रवेश करण्याचा निर्णय सर्वानुमते जाहीर करण्यात आला.

याप्रसंगी अहमदनगर जिल्हा गुरुमाऊली शिक्षक मंडळाचे व शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे, शिक्षक बँकेचे चेअरमन संतोष दुसुंगे, माजी चेअरमन साहेबराव अनाप, संचालक गंगाराम गोडे, बाळासाहेब मुखेकर, राजू राहणे, ज्येष्ठ नेते भाऊराव राहिंज, सुरेश निवडूंगे, विजय ठाणगे, राजू आव्हाड आदी उपस्थित होते.

गुरुमाऊली मंडळाने गेल्या चार वर्षांमध्ये बँकेमध्ये सभासद हिताचा कारभार केला असून शिक्षक संघाने सुद्धा शिक्षकांचे प्रश्न राज्यपातळीवर सोडविण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. म्हणून चांगल्या विचारांना साथ देण्यासाठी हा निर्णय तालुक्यातील कार्यकर्त्यांनी घेतल्याचे राजेंद्र सदगीर यांनी याप्रसंगी सांगितले. यावेळी सदिच्छाचे माजी व्हाईस चेअरमन राजेंद्र सदगीर, राज्य संघाचे सदस्य भाऊसाहेब वाकचौरे, उत्तर जिल्हा प्रमुख बाळासाहेब आरोटे, शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष अण्णासाहेब आभाळे, सदिच्छा मंडळाचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्र सुकटे, सखाहरी दाते, मारुती बांगर, कैलास सारूक्ते, बाळासाहेब मोहिते, केशव गोरडे, काळू सदगीर, अशोक पथवे, नितीन कोते, राजू आव्हाड, विलास सावंत, अनिल सोनवणे, नवनाथ वाकचौरे, पुरुषोत्तम भांगरे, राजू भांगरे, प्रशांत अभंग, गुंजाळ, पोपट चौधरी, अरुण सूर्यवंशी, राजू शिंदे, संजय गोडे, भामरे सर, प्रशांत गवारी, रंगनाथ भोसले, सोमनाथ घोरपडे, राजेंद्र भांगरे, सीताराम लोखंडे, संतोष सदगीर, विलास शिंदे, कैलास शेळके आदींनी गुरुमाऊली मंडळ व शिक्षक महासंघात प्रवेश केला.

ही प्रवेश प्रक्रिया पार पाडण्यासाठी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन बाळासाहेब मुखेकर, संचालक गंगाराम गोडे, राम वाकचौरे, प्रवीण साळवे, संजय मुखेकर, नितीन नेहे, राहुल गोडे, अजित दिघे, राजू शिंदे, मनोहर गोडे आदींनी परिश्रम घेतले.

गुरुमाऊली मंडळाच्या वर्धापन दिनीच अकोले तालुक्यात हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. त्यामुळे जिल्ह्यातील गुरुमाऊली प्रेमींमध्ये उत्साह संचारला आहे. शिक्षक महासंघाची 13 तारखेला रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे होणारी शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी सर्वांनी जोमाने कार्य करण्याची आवाहन बापूसाहेब तांबे यांनी केले. याप्रसंगी सर्वश्री भाऊराव राहिंज, अण्णासाहेब आभाळे, मच्छिंद्र सुकटे, बाळासाहेब आरोटे यांची भाषणे झाली.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!