Thursday, April 25, 2024
Homeनगरअकोलेत एक लाख 17 हजारांची दारू जप्त

अकोलेत एक लाख 17 हजारांची दारू जप्त

अकोले (प्रतिनिधी) – विनापरवाना देशी दारूची वाहतूक करणारी दोन वाहने उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले पोलिसांनी पकडली. एक लाख 17 हजार 312 रुपयांच्या दारूसह दोन वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. ही कारवाई काल शनिवारी सकाळी 6 वाजता अगस्ती साखर कारखाना रोडवर करण्यात आली.

मच्छिंद्र नाईकवाडी हा पांढरर्‍या रंगाच्या बोलोरो जीप व मारुती कारमधून देशी दारूची विक्री करत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांना मिळाली. त्यांच्या सूचनेवरून अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद जोधळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बी. एन. टोपले, पोलीस नाईक हासे, पोलीस शिपाई शेरमाळे, पोलीस वाहन चालक मोरे यांनी अगस्ती कारखाना रोडवर सापळा लावला. दरम्यान काल सकाळी 6 वाजता मच्छिंद्र नाईकवाडी हा त्याच्या ताब्यातील पांढर्‍या रंगाची बोलोरो मधून जाताना दिसला. त्यावेळी पोलिसांनी गाडी अडविली.

- Advertisement -

मात्र मच्छिंद्र नाईकवाडी हा गाडी सोडून पळून गेला. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 94 हजार 848 रुपयांचे 38 संजीवनी देशी दारूचे बॉक्स आढळून आले. तसेच मिळालेल्या माहितीनुसार जवळच लावलेल्या एम. एच. 14 एक्स 6505 या क्रमांकाची मारुती कारची तपासणी केली असता त्यामध्ये 22 हजार 464 रुपयांचे 9 संजीवनी देशी दारूचे बॉक्स आढळून आले.

बोलोरो वाहन व कारची किंमत एकूण चार लाख 70 हजार व एकूण दारूची किंमत एक लाख 17 हजार 312 रुपये असा एकूण पाच लाख 87 हजार 312 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. मच्छिंद्र नाईकवाडी याच्याविरुद्ध गुन्हा मुंबई प्रोव्हीजन अ‍ॅक्ट 65 (ई), (अ) प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बी. एन. टोपले करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या