Type to search

Featured नाशिक

रेल्वे स्टेशनवर एअर प्युरिफायर

Share

नाशिकरोड । प्रतिनिधी

येथील रेल्वेस्थानकात हवा शुध्द करणारी एअर प्युरिफायर मशिन्स लावण्यात येणार आहेत. त्यापैकी एक मशिन उभारण्याचे काम सुरु झाले. दोन मशिन्स आली असून ते योग्य ठिकाणी लावण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

रेल्वेचे अधिकारी आणि हे मशिन तयार करणार्‍या पुण्याच्या स्ट्राटा एनव्हायरो कंपनीचे संचालक अमोल चाफेकर यांनी स्थानक परिसराची काही दिवसांपूर्वी पाहणी केली होती. या स्थानकात सामाजिक संस्थाच्या मदतीने पहिल्या टप्प्यात दहा एअर प्युरीफायर मशिन्स लावण्याचे नियोजन असल्याची माहिती सूत्रांनी दिली. स्टेशनमास्तर आर के. कुठार, वरिष्ठ वाणिज्य अधिकारी कुंदन महापात्रा, रेल्वे अभियंता एस. जी. सैय्यद, विजय तिवडे, इलेक्ट्रिक विभागाचे अजय कुमार, आरपीएफचे उपनिरीक्षक डी. पी. झगडे, योगेश सुडके आदी उपस्थित होते.

नाशिकरोड रेल्वेस्थानकातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. स्थानकात प्रवेशव्दाराजवळ खासगी वाहनांमुळे हवा प्रदूषित होते. तेथे सहा एअरप्युरिफायर लावण्यासाठी कंपन्या, संस्थांना जागा व मशिन उपलब्ध केले जाईल. त्यांना त्याव्दारे जाहिरात करता येईल. त्यांनी पुढे यावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. एक ते पाच लाखापर्यंत किमंत असलेले एअर प्युरिफायर मिनिटाला किमान 2000 क्यूबिक फूट हवा, धूळ एक मशिन खेचून घेते. नंतर ही धूळ, माती नर्सरींना वापरण्यासाठी देण्यात येते. कंपनी हे मशिन्स मोफत उपलब्ध करते. मशिनवर प्रायोजक जाहिरात लाऊ शकतात.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!