Thursday, April 25, 2024
Homeनगरअहमदनगर महापालिका उपायुक्त सुनील पवार यांची बदली

अहमदनगर महापालिका उपायुक्त सुनील पवार यांची बदली

जिल्हाधिकार्‍यांचा आदेशही बदलला: आता पठारे यांच्याकडे पदभार

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर महापालिकेचे उपायुक्त सुनील पवार यांची अचानक बदली झाल्याचे सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांना प्रमोशन मिळाल्याचे आदेश सोमवारी सकाळी नगर महापालिका प्रशासनाला मिळाले. परदेशात अडकून पडलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना मायदेशी आणण्याची जबाबदारी आता दुसरे उपायुक्त प्रदीप पठारे यांच्यावर टाकण्यात येत असल्याचा नवीन आदेश कलेक्टरांनी काढला.

- Advertisement -

परदेशातून येणार्‍या व्यक्तींच्या माहितीसाठी आता नोडल ऑफीसर म्हणून नव्याने महानगरपालिकेचे उपायुक्त डॉ.प्रदीप पठारे यांची नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत. लॉकडाऊनच्या काळात परदेशातून अडकलेल्या व्यक्तींशी समन्वय साधून कार्यवाही करण्याकरीता महापालिकेचे उपायुक्त सुनील पवार यांची नियुक्ती 7 मे रोजी केली होती.

तसे आदेश कलेक्टर राहुल द्विवेदी यांनी काढलेही. पण अचानक हे आदेश बदलावे लागले. कारण पवार यांची बदली नगरहून कल्याण-डोंबिवली महापालिकेत करण्यात आली आहे. त्यामुळे पवार यांच्याऐवजी आता पठारे हे नोडल ऑफिसर म्हणून कामकाज पाहणार आहेत. तसे जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी तसे सुधारीत आदेश दिले आहेत. 12 नोव्हेंबर 2018 रोजी पवार हे सांगलीहून नगरला बदलून आले होते.

नगरमध्ये उपायुक्त म्हणून जवळपास दीड वर्षे त्यांनी कामकाज पाहिले. कालपासून ते महापालिकेत आले नाहीत.आज सकाळी त्यांच्या बदलीचे आदेश महापालिका प्रशासनाला मिळाले. अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती मिळालेल्या पवार यांच्याकडे तिकडेही कोव्हिड उपाययोजना कक्षाचे प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

महापालिकेत गर्दी
परदेशात अडकून पडलेल्या नागरिकांशी समन्वय साधून त्यांना मायदेशी आणण्याची जबाबदारी ही महापालिकेचे उपायुक्त प्रदीप पठारे यांच्यावर देण्यात आली आहे. परदेशातील नागरिकांच्या नातेवाईकांनी आज महापालिकेत गर्दी केली. आता या गर्दीला पठारे हे सामोरे जात आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या