Type to search

Breaking News मुख्य बातम्या सार्वमत

अहमदनगर : अपघात झाल्यानंतर कारने घेतला पेट; पोलीस कर्मचारी बचावला

Share
अहमदनगर : अपघात झाल्यानंतर कारने घेतला पेट; पोलीस कर्मचारी बचावला Latest News Ahmadanagar Accidents Car To Fire Police Constable Injured

श्रीगोंदा : पारगाव फाटा नजीक कॅनॉल जवळ (दि.१६) रोजी रात्री अकराच्या सुमारास फोर्ड ऐकॉन कंपनीच्या गाडीचा स्फोट झाला. यामध्ये पोलीस कर्मचारी शैलेंद्र जावळे किरकोळ जखमी झाले. त्यांना तात्काळ श्रीगोंदा येथील ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अधिक माहिती अशी कि, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी जावळे कामानिमित्त श्रीगोंदा येथे आले असता नगरला परतत असतांना हा अपघात झाला. या अपघातात ते किरकोळ जखमी झाले. सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस कर्मचारी जावळे परतत असतांना गाडीचा वेगअधिक असल्याने नियंत्रण सुटून गाडी वळणावर धडकली. त्यानंतर गाडीने अचानक पेट घेतल्याने इथून जाणाऱ्या काही प्रवाशांनी प्रसंगावधान राखत पेटलेल्या गाडीतील जावळे यांना बाहेर काढत गाडीपासून दुर नेले. त्यानंतर काही क्षणात पेटलेल्या फोर्ड ऐकॉन गाडीचा मोठा स्फोट झाला. यावेळी मदत करणाऱ्या प्रवाशांनी वेळीच जावळे यांना बाहेर काढल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!