Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगर : आरटीओ परिसरात एजंटांची दुकानदारी

Share
नगर : आरटीओ परिसरात एजंटांची दुकानदारी, Latest News Agents Shop Rto Area Ahmednagar

अहमदनगर (प्रतिनिधी) – प्रशासनाने गतीमान कारभारासाठी ऑनलाईनचा उतारा शोधला असला तरी अधिकारी-कर्मचार्‍यांशी लागेबांधे करत एजंटांनी आरटीओ कार्यालयात दुकानदारी सुरू केल्याचे धक्कादायक वास्तव पाहणीत दिसून आले. कार्यालयाच्या आवाराकडेलाच नागरिकांनी लूटमार सुरू असल्याचे चित्र प्रत्यक्ष भेटीत दिसून आले.

आरटीओ कार्यालयातील एजंटांची साखळी ब्रेक करण्यासाठी ऑनलाईनची प्रक्रिया सुरू करण्यात आली. ड्राईव्हींग लायसन्स मिळण्याची प्रक्रियाही ऑनलाईन करण्यात आली. नागरिक सिस्टीमने गेले तर त्यांना महिना दिड महिन्याचा कालावधी लागतो. मात्र तेच काम एजंटामार्फत केले तर अवघ्या काही दिवसांतच त्यांना लायसन्स दिले जात असल्याचे माहिती घेता सांगण्यात आले. ऑनलाईन अपार्टमेंट फ्री असतानाही एजंट मात्र प्रती लायसन्स दोनशे रुपये उकळून लूटमार करत असल्याचे दिसले.

वाहन ट्रान्सफर तसेच अन्य किरकोळ कामासाठी लागणारे छापील अर्ज आरटीओ कार्यालयातून मिळणे बंधनकारक असतानाही ते दिले जात नाही. त्याऐवजी तेथील कर्मचारीच शेजारच्या एजंटांकडे बोट दाखवितात. आरटीओतील कर्मचारीत नागरिकांना एजंटाचा दरात लोटत असल्याचेही दिसून आले. वाहन नसतानाही पीयूसी प्रमाणपत्र मिळत असल्याचा धक्कादायक अनुभवही या कार्यालयात पहावयास मिळाला. कार्यालयाकडेलाच व्हॅन पार्क करून त्यातून एजंटांची लूटमार सुरू असल्याचे दिसले. फुकटाच्या फॉर्मसाठी नागरिकांना पैसे मोजावे लागत आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी यात लक्ष घालून ही लूटमार थांबवावी. एजंटांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!