Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या

आणि निवडणूक अधिकाऱ्यांवर भडकल्या जया बच्चन ..

Share

 मुंंबई:

मुंबईत जुहू येथील मतदान केंद्रावर जया बच्चन त्यांचा मुलगा, अभिषेक बच्चन आणि सून, अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन यांच्यासह मतदानासाठी पोहोचल्या होत्या. मतदान दिल्यानंतर जया बच्चन परतत असताना तिथे कार्यरत असणाऱ्या पोलिंग बूथ निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत एक सेल्फी काढण्याची विनंती केली. त्यांच्या या विनंतीवर बिग बींच्या पत्नीचा म्हणजेच जया बच्चन यांचा संताप अनावर झाला.

निवडणूक अधिकाऱ्यांना त्यांची ही कृती अतिशय चुकीची असल्याचं त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितल्य़ाची माहिती सुत्रांनी दिली. मी इथे मतदानासाठी आले आहे. तुम्ही इथे अधिकारी आहात. फोटोसाठी विनंती करण्याजोगी क्षुल्लक मागणी तुम्ही करणे योग्य नाही. अश्या खडतर शब्दांत जया बच्चन यांनी तिथे असणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांना धारेवर धरल. त्यांचा हा संताप पाहून अधिकाऱ्यांना धक्काच बसला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!