Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

अभिनेते पोंक्षे यांच्या वाहनाची काच फोडली

Share
अभिनेते शरद पोक्षेंंच्या कारची काच फोडली, Latest News Actor Shard Pokshe Car Stone Broke Ahmednagar

सीसीटीव्ही फुटेज तपासणीतून समोर आला प्रकार

अहमदनगर (प्रतिनिधी) –  स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या बद्दलच्या वक्तव्यामुळे वादात सापडलेल्या अभिनेते शरद पोंक्षे यांच्या वाहनाची काच सोमवारी नगरमध्ये अज्ञातांनी फोडल्याचं समोर आले आहे. पोंक्षे यांच्यावरील रागातून हा प्रकार घडला नाही ना, असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, चोरीच्या उद्देशाने कुणीतरी हा प्रकार केला असल्याचे सीसीटीव्ही फूटेजच्या तपासणीतून स्पष्ट झाले आहे. वाहनातून काहीही चोरीला गेले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 1 ते 3 मे रोजी नगरला येणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी अभिनेते पोंक्षे व नाट्य परिषदेचे मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी हे नगरला आले होते. नगर-मनमाड महामार्गावर एका हॉटेलमध्ये त्यांची पत्रकार परिषद होती. पत्रकार परिषद झाल्यानंतर निघण्यासाठी ते गाडीजवळ गेले असता काच फुटल्याचे उघडकीस आले. पोंक्षे यांच्या मध्यंतरीच्या काही वक्तव्यांचा निषेध म्हणून काच फोडल्याची चर्चा सुरू झाली होती.

या प्रकारानंतर तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हे घटनास्थळी आले होते. त्यांनी हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फूटेज तपासले. त्यात तिघे व्यक्ती कारजवळ आल्याचे दिसत आहे. त्यातील एकाने ड्राइव्हरच्या बाजूची काच फोडली. त्यावेळी इतर दोघे टेहळणी करत होते. त्यानंतर तिघेही निघून गेले. चोरीच्या उद्देशानं त्यांनी ही काच फोडल्याचं तपासात उघडकीस आलं. त्याचवेळी अर्धा किलोमीटरच्या अंतरावर एका कार्यालयात आलेल्या महिलेच्या कारमधील पर्सही चोरीला गेल्याचं निदर्शनास आलं. दोन्ही ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज पाहून पोंक्षे यांच्या वाहनाची काच चोरट्यांनी फोडल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!