Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

सर्वांनीच चांगले वागल्यास सीएए विरोधात आंदोलनाची गरज नाहीः रिंकू

Share
सर्वांनीच चांगले वागल्यास सीएए विरोधात आंदोलनाची गरज नाहीः रिंकू, Latest News Actor Rinku Rajguru Statement Caa Ahmednagar

अहमदनगर (प्रतिनिधी) – देशभरात सुरू असलेल्या ‘सीएए’ व ‘एनआरसी’ विरोधातील आंदोलनाबाबत अभिनेत्री रिंकू राजगुरूने (आर्ची) भाष्य केले. ‘सगळ्यांनी इतके चांगले वागायला पाहिजे की हे सर्व करायची गरजच पडायला नको’ अशी प्रतिक्रीया रिंकूने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर दिली आहे.

रिंकू एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नगर शहरात आली होती. यावेळी पत्रकार परिषदेत तिने हे भाष्य केले. दरम्यान काही कलाकार चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कधीकधी वादग्रस्त वक्तव्य करत असतात, तर काहीजण देशात सुरू असलेल्या वेगवेगळ्या आंदोलनात सहभागी होतात. हे योग्य आहे का? असे विचारले असता रिंकू म्हणाली, ‘कुणी कुठे जावे हा वैयक्तिक प्रश्‍न आहे. मी कुणाचे सल्ले घेतही नाही आणि कुणाला सल्ले देत देखील नाही. माझं बी. ए. चे शिक्षण चांगल्याप्रकारे सुरू आहे. मला चांगल्या चित्रपटांची ऑफर आल्यास मी ती स्वीकारते देखील, असेही ती म्हणाली.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!