Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मनपा शाळेत गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणार्‍यांवर कारवाई

Share

सातपूर । प्रतिनिधी

अशोकनगर परिसरातील विश्वासनगर भागातील एका शाळेत आसाराम बापू यांच्या कार्यकर्त्यांनी व्हॅलेन्टाईन दिवसा ऐवजी मातृपितृ दिन साजरा करण्याचे कारण सांगून शाळेच्या आवारात आसाराम बापू यांचा फलक लावुन त्यांचा प्रचार करणारी पत्रके ही मुलांना वाटली याबाबत आयुक्त स्थरावरुन तातडीने चौकशीचे आदेश देण्यात आले असून, दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.

विश्वासनगर येथील बी.डी. भालेकर या शाळेत सकाळी शाळेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता आसाराम बापू यांच्या कार्यकर्त्यांनी शाळेच्या आवारात प्रवेश करुन मातृपितृदिनाचे महत्व मुलांना सांगण्यास सूरूवात केली. मात्र अल्पावधित त्यांनी व्यासपीठावर आसाराम बापू यांचे छायाचित्र असलेले फलक झळकावले व पत्रकेही वाटली.

मनपा शाळांमधून गुन्हेगारांचे उदात्तीकरण होत असल्याबद्दल मनपा आयुक्तांना विचारण्यात आले असताना, यावेळी सदर घटनेबाबत अनभिज्ञता व्यक्त करुन मनपा आयुक्तांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले. व दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!