Sunday, April 28, 2024
Homeनगरनगर -सोशल मीडियावर अफवा; मुकुंदनगरच्या एकावर गुन्हा

नगर -सोशल मीडियावर अफवा; मुकुंदनगरच्या एकावर गुन्हा

अहमदनगर (प्रतिनिधी) – मुकुंदनगरमधील फकीरवाडा भागाची सोशल मीडियावर अफवा पसरविल्या प्रकरणी एकाविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताहीर शेख (रा. मुकुंदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

ताहीर शेख याने रविवारी रात्री दहा वाजता त्याच्या मोबाइल क्रमांकावरून कोरोना विषाणू आजारा संदर्भात सुफियाना शेख युवा मंच व इतर व्हाट्सअप ग्रुपवर चुकीचा संदेश फिरवला. मुकुंदनगरातील फकीरवाडा भाग मिलिट्रीच्या हातात देणार असून मुकुंदनगर फकीरवाडा भागातील सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी”, असा संदेश रविवारी रात्री फिरवल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी, “आज मिलिट्री मशीद के सामने कुछ सरकारी अधिकारी के साथ घूम रही है और घर के लोगों के बारे मे पूछे तो नाम और मोबाईल नंबर नही देना”, असा खोटा संदेश देखील फिरवला.

- Advertisement -

या खोट्या संदेशामुळे जनतेची दिशाभूल झाली. यामुळे शहर पोलिसांनी या संदेशाची दखल घेत तो संदेश कोणत्या मोबाईल क्रमांकवरून फिरवला गेला याची माहिती घेतली. त्यात ताहीर शेख याचे नाव पुढे आले. त्यानुसार त्याच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात भादंवि कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या